Wednesday, August 1, 2007

आज श्री ९ वर्षाचा झाला!!!!

आज श्री ९ वर्षाचा झाला!!!!

वेळ कसा उडून जातो कळत पण नाही आणी एक दिवस जाणवत आपल पिल्लू इतकं मोठं होउन गेलं कि कधी कधी आपल्यालाच ओळखू नाही येत।

श्री पण कधी इतका मोठा झाला की माझा पिल्लू नसून माझा मित्र झाला मला कळलच नाही। त्याच्या इतका समंजस, शान्त, आणी प्रेमळ मुलगा माझा आहे ह्यचा मला कधी कधी अत्यन्त गर्व होतो. कधी कधी तर वाटतं त्याला घडवण्यात माझा किव्हा प्रवीण चा काहीच वाटा नाही, तो स्वभावनेच तसा आहे.

त्याला माझे खूप खूप आशिर्वाद!!!

7 comments:

Anonymous said...

रश्मीताई
खरं सागू कां,तू मला ४० वर्षामागे नेलस,हा तूझा post वाचून.
माझा पण श्री असाच होता ९
वर्षावर,मला पण अगदी तुझ्या सारखं वाटलं त्यावेळी,माझ्या श्रीचा पण स्वभाव तुझ्या श्री सारखाच होता बघ,मी पण त्यावेळी असंच मनात म्हटलं होतं की आमच्या दोघांचा त्याला घडवण्यात काहीच वाटा नाही.तो स्वभावानेच तसा आहे.
पण माझ्या श्रीची रुक्मीणी आली आणि श्री साफ बदलला.९ वर्षाचा माझा श्री आता ४९ वर्षाचा झाला.
दोन मुलं झाली पण तो बदलला तो बदलला."एका हाताने टाळी वाजत नाही","दोनही बाजू ऐकल्या पाहीजेत","दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करू नये",वगैरे ,बगैर तू म्हणशील तुझ्या मनात
कदाचीत.

तुला मी नाराज करत नाही असं लिहून.सगळेच श्री असे मोठे झाले की बदलतात बघ,मला हे अनुभवाने कळलं.मी तुला आता म्हणतोय ना तसचं मला त्यावेळी एका "बुजूर्गाने" सांगितलं होतं.मला राग आला होता त्याचा तेव्हा,"मुळीच नाही आमचा श्री असा होणारच नाही" असे मी त्याला म्हणालो होतो.
थोडक्यात काय,९ वर्षाचा १९ वर्षाव्रर आणि १९ वर्षाचा
४९ वर्षाव्रर स्वभाव बद्लतो बघ.पण करणार काय,आईवडिल असतो नां?कुणाकडे तकरार करणार?
श्रीनिवास खळ्याचे ते गाणे आठवले बघ,"लळा जिव्हाळा शब्दच खोटे ,कोण कुणाचे नाही बाईगं,कोण कुणाचे नाही.
तुझ्या श्रीला दीर्घायुषी हो हे आशिर्बाद.

HAREKRISHNAJI said...

आपल्या श्री ला जन्मदिवसाच्या बिलंबाने का होईना शुभेच्छा.

माझा मुलगा जेव्हा १७ वर्षाचा झाला, तेव्हा मी हेच म्हटले होते कि काळ इतका भरभर पुढे सरकतो की कळातच नाही,आज हा केवढा मोठा झालाय ?

मग माझे वडील म्हणाले, अरे तुझाही बाबतीत आम्हाला ही तसेच वाटते. आपली मुले आपली मित्र असण्यासारखे दुनियात दुसरे सुख नसावे.

HAREKRISHNAJI said...

nothing new ?

Vaishali Hinge said...

इतका मोठा झाला की माझा पिल्लू नसून माझा मित्र झाला मला कळलच नाही। >>
agadee asach jhalay maajhahii..!!

HAREKRISHNAJI said...

श्री काय म्हणतोय ? कसा आहे ?

HAREKRISHNAJI said...

The question is "To write or not to write (blog)"

Unknown said...

Do you still use free service like blogspot.com or wordpress.com but
they have less control and less features.
shift to next generation blog service which provide free websites for
your blog at free of cost.
get fully controllable (yourname.com)and more features like
forums,wiki,CMS and email services for your blog and many more free
services.
hundreds reported 300% increase in the blog traffic and revenue
join next generation blogging services at www.hyperwebenable.com
regards
www.hyperwebenable.com